Patient Testimonials

Depend on Us for Life.

हार्दिक शुभ कामना,

'शिव भावे' घडते आपल्या हातून रुग्ण सेवा,

त्यातून मिळतो अध्यात्मिक आनंदाचा ठेवा।

घडता आपल्या हातून अशी सेवा,

रुग्णांच्या पाठीशी आशीर्वादाचा ठेवा।

वैदकीय अधिकाऱ्या सवे सर्व कर्मचारी,

रुग्णांची परोपरी करतात सेवा चाकरी।

सेवेचा आनंद घेऊन जातो घरी,

नित्य आपली आठवण राहील जीवनानंतरही।

अशीच घडो आपल्या हातून रुग्णांची सेवा,

नित्य मिळेल आपल्याला शुभ आशीर्वादाचा मेवा।

सोपान नारखेडे देतो आपणास हार्दिक शुभकामना,

उत्तरोत्तर घडो दवाखान्याची प्रगती हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

 

 

सोपान नारखेडेऔरंगाबाद

सिग्मा हॉस्पिटलबद्दल आजपर्यंत फक्त ऐकले होते पण आज प्रत्यक्ष अनुभव आला. आपल्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफची भाषा अतिशय नम्रतेची आहे. सर्व गोष्टी समजावून सांगण्याची त्यांची पद्धत खूप चांगली आहे. हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर २५% आराम अगोदरच मिळून जातो.

 

पवनकुमार भाऊसाहेब कदमऔरंगाबाद

सादर प्रणाम

मी आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंदजी देवधर यांच्या शुभहस्ते 'हृदय शस्त्रक्रिया' करून घेतली. त्या निमित्त दि. २३/१२/२०१७ ते ०१/०१/२०१८ भरती होतो. डॉ. संचेती लोनार यांच्या मार्गदर्शनानुसार आपले हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना फार चांगले अनुभव प्राप्त झाले. त्यातील काही प्रमुख अनुभव खालीलप्रमाणे:

 

शिष्ठबद्ध प्रवेश प्रक्रिया.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हेच प्रत्यंतर.

गरीब असो या श्रीमंत सर्वांना समान वागणूक.

सेवाव्रती कर्मचाऱ्यांना मामा, मावशी या जिव्हाळ्याचा नावाने संबोधन हृदयाला स्पर्श करून जाते.

दवाखान्याचा सर्व विभागामधील स्वच्छता.

प्रत्येक वॉर्ड तथा विभागप्रमुखांचे मार्गदर्शन.

महात्मा फुले जीवनदायी योजना सेल कर्मचाऱ्यांचे सहकार्य.

अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञांचे वेळोवेळी भेटी व मार्गदर्शन व वेळेचे बंधन.

अंतर्गत सुरक्षा व्यवस्था व लिफ्टचे नियोजन.

चहलपहल असतानाही निरव शांतता.

मला हृदयशत्रक्रियेचा माध्यमातून हॉस्पिटलमध्ये उपयुक्त सहकार्याबद्दल ;हार्दिक अभार'. आपण स्वीकारलेल्या या व्रताला शतशः प्रणाम व प्रांजळ शुभेच्छा!

 

 

प्रकाश छो. सुपटयाणमाऊलीनगर, लोणार

डॉक्टर उन्मेष टाकळकरांवर आमचा खूप विश्वास आहे, म्हणूनच आम्ही नेहमी युनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये येतो.

 

सुनीता शरद पद्येऔरंगाबाद

आम्हाला युनाइटेड सिग्मा हॉस्पिटल मध्ये सर्वात चांगली सेवा मिळाली. पुणे रुबी हॉलपेक्षाही चांगले सहकार्य मिळाले.

 

विनोद हरसिंग परदेशी औरंगाबाद

हॉस्पिटलमधील सर्व घटक, डॉक्टर, स्टाफ, स्वच्छता, औषदे चांगल्या दर्जाची आहेत. आम्हाला इथे आल्यावर आम्ही देवळातच वास्तव्यास आहोत व सर्व डॉक्टर म्हणजे देव भेटावयास येत आहेत असा अनुभव आला.

 

प्रसाद रामकृष्ण देशपांडेऔरंगाबाद

हॉस्पिटल मधील आरोग्य सेवा, उपचार, सोयी व सुविधा उत्कृष्ट दर्जाची असून, त्यासाठी आम्ही आभारी आहोत.

 

प्रदीप राजाराम भालेराव औरंगाबाद

We are satisfied with your hospital's services. Thanks to all employees of CIIGMA Hospital.

 

Jadhav Krishna Madhukar Aurangabad

सिग्मा हॉस्पिटलमध्ये आल्यावर आणि इथल्या डॉक्टरांनी दिलेल्या आधारामुळे व उपचारामुळे खूप समाधानी झालो.

 

राम विश्वनाथ गव्हाणेऔरंगाबाद

प्रवेशावेळी मनात असणारी भीती व मनातील शंकेचे पूर्ण निरसण होऊन जाताना मन अगदी प्रसन्न झाले व यानंतर कोणताही उपचार करावयाचा असेल तर फक्त युनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्येच करणार हे मनाशी पक्क केलं.

 

वसंत गंगाधर पांडे औरंगाबाद

आदर पूर्वक नमस्कार,

तुम्हाला डॉक्टर म्हणू , का माझ्या जीवनाचा तारणहार म्हणू, हा प्रश्न नेहमीच मला सतावत राहिला आहे. वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांकडून सेवाभावी सुश्रुषा मिळणे, हे आजकाल अवघड झाल आहे. डॉक्टरांच्या प्रतिमे प्रति विविध तर्क असतील, परंतु या सर्व प्रतिमेला नुसता तडा देणार असे नव्हे, तर देवासमान ज्याचा उल्लेख नेहमीच व्हावा, असे व्यक्तिमत्व म्हणून मी अपना सर्वाकडे पाहतो. आजारपणातील अगतिकता एका रुग्णाला डॉक्टरावर भरोसा ठेवण्यासाठी प्रेरित करून जाते, यात वाद नाही. परंतु डॉक्टरांवर अशी श्रधा ठेवल्या नंतर माझा डॉक्टर या श्रद्धेला पात्र ठरण, हा जीवन सार मला आपल्या कडील अनुभवातून मिळाला. आजारपणाच्या निमित्ताने मला आपले सानिध्य लाभल्यानंतर आपण ज्या पद्धतीनी माझी काळजी घेतलीत, आपल्या कडील सन्माननीय डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. आशिष देशपांडे, डॉ भरतकुमार, डॉ. विरेद्र वडगावकार, डॉ. राजकुमार घुमरे , डॉ. अजय रोटे, तसेच नर्सिंग, सर्व सहकारी कर्मचारी या सगळ्यांनी मिळून ज्या एकसंघ वृतीने माझ्यावर आलेल्या अरीष्ठाला परतवून लावले, त्याची स्तुती करणे हि केवळ औपचारिकता होईल. परंतु जे अपार कष्ट आपण माझ्यासाठी घेतलेत, त्याची भरपाई कधीच होऊ शकणार नाही, याबाबतचा विश्वास मी निरंतर बाळगणे, हीच आपल्या ज्ञानाच्या कौशल्येला दिलेली एक उचित पावती ठरेल. डॉक्टरांना देव का म्हटल जात, याच उत्तर मी आपल्या सानिध्यात राहून अनुभवातून घेतले . यासाठी मी भगवंताचा अतिशय ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या हातून नित्यनियमे हे सत्कर्म घडत राहो. आपण हा जनसेवेचा घेतलेला वसा असाच चालत राहो, या बद्धल मी देवाला अगदी साकडे घालतो. मी तुमचे वैयक्तिक आभार मानल्यापेक्षा, आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्ण सेवेचा जो होम हाताळण्याचे कसब पेलले आहे, त्या बाबत उपकार जाणीव ठेवणे, हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो. सधन्यवाद.

 

अशोक सूर्यवंशीलक्ष्मी क्लॅथ सेंटर, उस्मानपुरा, औरंगाबाद

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा; हे युनाइटेड सिग्मा चे वैशिष्ट्य व इथे आल्यावर प्रत्यक्षात हीच अनुभूती आली. इथे घरच्यापेक्षाही चांगली सेवा मिळाली.

 

अशोक सूर्यवंशीऔरंगाबाद

सिग्मा हॉस्पिटल मधील सर्व स्थरातील टीमचे कार्य कौतुक करण्यासारखे आहे. विशेषतः डॉ. देवधरांना माझ्या कोटी कोटी शुभेच्छा.

 

दिपक दिनकर जायभायऔरंगाबाद

आमच्या रुग्णाची खूप साध्यता केली याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद!

 

राजू हाबू पवार औरंगाबाद

डॉक्टरांचे मार्गदर्शन व सेवा अतिशय चांगली वाटली. इतर डॉक्टर व कर्मचारी खूपच आदराने व आनंदाने विचारपूस करतात, त्यामुळे रुग्णाला मानसिक समाधान मिळते. आपणास खूप खूप शुभेच्छा!

 

स्नेहल रावसाहेब पिठले औरंगाबाद

युनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये आल्यावर आम्हाला राजीव गांधी योजनेबाबत माहिती मिळाली. आम्हाला याचा पूर्णपणे लाभ घेता आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

 

गजानन बाबुराव इठोले औरंगाबाद

आपल्या दवाखान्यातील स्वच्छता, शांतता व नीटनेटकेपणामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आपले आभार!

 

शांताराम साडू कोलते औरंगाबाद

हृदय रोगासारख्या आजारावर अत्यंत काळजीपूर्वक व योग्य उपचार करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या टीमला शुभेच्छा.

 

बोराडे गणेश त्रिंबकरावऔरंगाबाद

I am fully satisfied with this hospital, all doctors and other staff.

 

Sayed Bashir AhmedAurangabad

Very good communication with patient.

 

Somanth RamekerAurangabad

Good service and excellent co-ordination.

 

Amit PandeyAurangabad

एक नंबर हॉस्पिटल आहे औरंगाबाद मध्ये.

 

एस. एस. तापे औरंगाबाद

The hospital serves its patients with a lot of respect.

 

Arati Prashant PatilAurangabad

रूग्णालयातील सेवा सुविधा अति उत्क्रूष्ट आहे. मी व माझे नातेवाईक पूर्ण समाधानी आहोत.धन्यवाद!

 

तांबे एकनाथ भानुदास औरंगाबाद

रूग्णांची काळजी चांगल्या प्रकारे घेतात.

 

श्रीमती.अलका दिलीपराव देशमुखऔरंगाबाद

हॉस्पिटल मधील सेवासुविधा चांगली आहे.

 

रमेश गोविंद राठोड औरंगाबाद

It is our good fortune that Dr. Takalkar practices in Aurangabad. I felt safe getting a treatment from Dr.Takalkar and he even made me smile in times of trouble. I am very grateful to CIIGMA hospital and its staff.

 

Sunil Pandurang KulkarniAurangabad

रुग्ण ग्रामीण भागातील असो की, शहरी भागातील रुग्णांना तातडीची सेवा देऊन आपले रुग्णालय सामाजिक व राष्ट्रहित जोपासत असून आपले कार्य प्रभावी पद्धतीने पार पाडत आहे.

 

श्री. कृष्णा दादाराव वाघऔरंगाबाद

CIIGMA Hospital provides good medical treatment. All the sisters and brothers in hospital have very good temper.

 

Bhaagvad Naguni BhavaleCEO & Founder

The hospital serves with utmost care to patients from rural and urban areas and are thus fulfilling the social and national responsibilities.

 

Krushna Dadaroa WaghCEO & Founder

So pleasant, clean and high quality I.C.U. has never been seen before. Everything is said by this statement.

 

Anjani Siddhant GulwadiAurangabad

Great cleanliness. Dr. Takalkar's is Lord Brahma for us.

 

Vitthal ValekarAurangabad

Hospital's cleanliness is good and it is gives good treatment. In this atmosphere, the health of patients can become good.

 

 

Diagnosis and treatment of every disease happens at one place, so this avoid inconvenience.

 

 

We are very grateful to the entire staff of CIIGMA hospital for giving the most quality service.

 

Naamdev Baliram BobdeAurangabad

Since the day we all patients have been admitted in the hospital, we got very nice service.

 

Vipul Somnath PatneAurangabad